30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ तीनही विधानसभा क्षेत्रात  तिसऱ्या दिवशी 4  नामांकन

तीनही विधानसभा क्षेत्रात  तिसऱ्या दिवशी 4  नामांकन

0
32
  • मंगळवारी 30 उमेदवारांनी केली 65 नामनिर्देशनपत्राची उचल
  • 174 उमेदवारांनी केली 418 नामनिर्देशनपत्राची उचल

 भंडारा,दि. 1 : 21 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी आज मंगळवारला चार नांमांकन दाखल करण्यात आली आहे. तर 30 उमेदवारांनी 65 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली आहे. आतापर्यंत 174 उमेदवारांनी 418 नामनिर्देशनपत्राची उचल केली असून चार उमेदवारांनी पाच नामांकन दाखल केली आहेत. आज मंगळवारी  तुमसर 5 उमेदवार 14  नामनिर्देशनपत्र, भंडारा 8 उमेदवार 20 नामनिर्देशनपत्र तर साकोली 17 उमेदवार  31 नामनिर्देशनपत्राची उचल केली. तर साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये अपक्ष म्हणून सुहासबाबु अनिलबाबु फुंदे तर तुमसर मध्ये के.के. पंचबुध्दे यांनी तर  चरण वाघमारे यांनी भारतीय जनता पार्टी व अपक्ष म्हणून   नामांकन  दाखल केले आहे.

60-तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये आज 5 उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्र उचल केली. तर यापूर्वी  34 उमेदवारांनी 98 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली आहे. या क्षेत्रात आतापर्यंत एकूण 39 उमेदवारांनी 112 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. यामध्ये राजकीय पक्ष व अपक्षांचा समावेश आहे. आज तिसऱ्या दिवशी या क्षेत्रात दोन उमेदवारांनी तीन नामांकन दाखल केले. यामध्ये अपक्ष म्हणून के.के. पंचबुध्दे तर अपक्ष व भारतीय जनता पार्टी कडून चरण वाघमारे यांनी नामांकन दाखल केले आहे.

61-भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये आज 8 उमेदवारांकरीता 20 नामनिर्देशनपत्र स्विकारलेली आहे. यापूर्वी  68 उमेदवारांनी 169 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. आतापर्यंत येथे 76 उमेदवारांनी 189 नामनिर्देश्नपत्राची उचल केली आहे. परंतु एकाही उमेदवारांचा अर्ज दाखल झालेला नाही. उचल करण्यात आलेले नामनिर्देशनपत्र्य  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना, भारतीय कॅम्युनिष्ठ पार्टी, बहुजन समाज पार्टी, पिपल्स रिपब्लीकन पार्टी व अपक्षांनी उचल केलेली आहे.

62-साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आज 17 उमेदवारांकरीता 31 नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आली असुन पहिल्या दोन दिवसात 42 उमेदवारांनी 86 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली आहे. आता पर्यंत 59 उमेदवारांनी 117 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली असून सुहासबाबु अनिलबाबु फुंदे  यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आतापर्यंत याक्षेत्रात दोन उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. उर्वरित भंडारा विधानसभा क्षेत्रात अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

आतापर्यंत तीनही क्षेत्रात एकूण 174 उमेदवारांनी 418 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. नामनिदे्रशन पत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर व साकोली यांच्या सतरावरुन दुपारी 3 वाजेपर्यंत वितरित करण्यात येत आहेत.  4 ऑक्टोंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारणे व दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.