32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन १ ते २४ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन

फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन १ ते २४ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन

0
28

वाशिम, दि. ०१ : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामार्फत फिरत्या लोक अदालतीसाठी पाठविण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. आज, १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. गो. बिलोलीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून फिरत्या लोक अदालतीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी फिरत्या लोक न्यायालयाचे पॅनेल प्रमुख निवृत्त न्यायधीश एस. एस. हिरुरकर, सर्व न्यायिक अधिकारी,  जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. डी. मोरे, उपाध्यक्ष अॅड. बबनराव इंगोले, तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. व्यवहारे, वरिष्ठ विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.नागरिकांनी फिरत्या लोक अदालतीस जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बिलोलीकर यांनी केले. ‘न्याय आपल्या दारी, न्याय सर्वांसाठी’ हे ब्रीद वाक्य घेवून फिरती अदालत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाणार आहे.

blank