29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ युवा स्वाभीमानच्या उमेदवाराने बैलबंडी रॅलीतून सादर केला उमेदवारी अर्ज

युवा स्वाभीमानच्या उमेदवाराने बैलबंडी रॅलीतून सादर केला उमेदवारी अर्ज

0
28

गोंदिया,दि.०३ः-गोंदिया विधानसभा मतदारसंघाकरीता होऊ घातलेल्या निवडणुकीकरीता युवा स्वाभीमान पक्षाच्यावतीने गोंदिया जिल्हा युवा स्वाभीमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला.प्रितम लॉन येथून पक्ष कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांना सोबत घेत बैलबंडी रॅली काढून उपविभागीय अधिकारी कार्यालय युवा स्वाभीमान पक्षाची रॅली पोचली.त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे जेष्ठ मार्गदर्शक वाय.पी.येळे,शिव नागपूरे,सुनिल भोगांडे,जिवन शरणागत,राकेश टेंभरे आदी पदाधिकारी व शेकडोच्या संख्येत कार्यकर्ते सोबत होते.

पत्रकार नविन अग्रवाल भरणा उद्या उमेदवारी अर्ज

गोंदिया येथील पत्रकार नविन अग्रवाल यांनी सुध्दा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली असून उद्या शुक्रवारला (दि.4)ते आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.अग्रवाल यांनी आपल्या सर्व मित्रमंडळी हितचिंतकांना 12 वाजता एसडीओ कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.