जत(राजेभक्षर जमादार),दि.03ः- जत तालुक्यातील करजगी येथे विज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला सायकांळी घडली. श्रीशैल कलाप्पा पट्टणशेट्टी (वय 45 रा.करजगी ) हे गावापासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या शेतामधील घराच्या छतावर जाऊन प्लास्टिक घालत असतांना अंगावर विज पडून त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्यामागे पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परीवार आहे.सदरची माहीती उमदी पोलिसांना मिळताच घटना स्थळी हवालदार बामणे यांनी पोचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले.




