26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय गोंदियातून अमर वराडे तर मुख्यमंत्र्याच्या विरोधात आशिष देशमुख रिंगणात

गोंदियातून अमर वराडे तर मुख्यमंत्र्याच्या विरोधात आशिष देशमुख रिंगणात

0
66

गोंदिया,दि.03ः- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 19 जणांची चौथी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.विदर्भातील सर्वात चर्चेत असलेल्या गोंदियाच्या जागेवर काँग्रेसने प्रदेश सचिव अमर वराडे यांना रिंगणात उतरविले आहे.आशिष देशमुख यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिल्लोडमधून प्रभाकर पालोडकरऐवजी कैझर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. तर नंदुरबारमधूनही उमेदवारी बदलण्यात आली आहे. उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ओवळा माजिवाडा – विक्रांत चव्हाण,  कणकवली – सुशील अमृतराव राणेंना,कामठी मधून सुरेश भोयर,रामटेक उदयसिंह यादव,चंद्रपूरातून  महेश मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.