मुंबई,दि.04- भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्या जागी भाजप नेते सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार चरण वाघमारे यांची उमेदवारी कापून त्यांच्याएैवजी तुमसरचे नगराध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.काटोलमधून चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.





