देसाईंगज,दि.04ः- येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ३ ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाइं महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. कृष्णा गजबे यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले.यावेळी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, खा. अशोक नेते, सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, संदीप धापोडकर, जि.प. अध्यक्षा योगीताताई भांडेकर, नाना नाकाडे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आ. गजबे यांचे नामांकन अर्ज देसाईगंज येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजू जेठाणी, नंदू पेट्टेवार, आनंद चोबे, राम लांजेवार, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, मोहन गायकवाड, गोपाल उईके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरत जोशी, डॉ. श्रीकांत बन्सोड, नगराध्यक्ष शालू दंडवते, मोतीलाल कुकरेजा, चांगदेव फाये, विलास गोटेफोडे, पवन नारनवरे, हैदरभाई पंजवाणी, भरत बावणथळे, बबलू हुसेनी, नसरूद्दीन भामानी, नरेश विठलानी, सर्व नगरसेवक, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व बुथप्रमुख, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




