
गोंदिया/भंडारा/नागपूर,दि.04:नागपूरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक आमदार रॅलीत सहभागी झाले होते.संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माल्यार्पण केले. याठिकाणी जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांना अभिवादन करत, रॅलीस प्रारंभ झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह अन्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले.”,
कामठीः- मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी शुक्रवारी आपले नामांकन दाखल केले. ऐनवेळी भाजपश्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी नाकरून त्यांच्या पत्नीला तिकीट दिले.
भंडारा जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार नरेन्द्रभाऊ भोंडेकर यांच्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याकरिता जिल्ह्यातील शिवसैनिक व जनतेचा जणू जनसागरच उसळला होता.एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी उसळलेला जनसैलाब राजकीय पक्षाच्या उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी रिपाईचे अधिकृत उमेदवार अमर वराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शहिद भोला काँग्रेस भवन येथून त्यांनी पदयात्रा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले.अर्ज दाखल करण्यापुर्वी त्यांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.त्यांचेसोबत प्रदेश सचिव विनोद जैन,पृथ्वीपालसिंह गुलाटी,जितेंद्र कटरे,एड.योगेश जायस्वाल,विरेंद्र जायस्वाल,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष एड.के.आर.शेंडे यांच्यासह एनएसयुआय व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.




