30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ प्राचार्य डॉ. सुजित टेटे राष्ट्रीय टीचर इनोवेसन अवॉर्ड 2019 ने सन्मानित

प्राचार्य डॉ. सुजित टेटे राष्ट्रीय टीचर इनोवेसन अवॉर्ड 2019 ने सन्मानित

0
25

देवरी,दि.4ः नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात मागील 10 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सतत अलौकिक कामगिरी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमातिल शिक्षण देऊन , शैक्षणिक , क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात प्राचार्य डॉ. सुजित हंसराज टेटे यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय टीचर इनोवेसन अवॉर्ड 2019 साठी देशातील विविध राज्यातून शिक्षकानीं आपले संशोधन सादर करून सहभागी झालेले होते यामध्ये डॉ सुजित टेटे यांनी “स्टुडेन्ट ऑफ द विक- ओव्हर ऑल डेव्हलेपमेंट ऑफ स्टुडेन्ट” या विषयावर संशोधन अहवाल सादर केला होता.या संशोधनात एक रुपया खर्च न करता विद्यार्थी विकास, शिस्त, आत्मविश्वास, आदर, अभ्यासुवृत्ती आणि शैक्षणिक प्रगती अशा विविध घटकाचा विकास साधता येतो. या संशोधनाला महत्वाचे स्थान देऊन टीचर इनोवेशन अवॉर्ड 2019 यांना बहाल करण्यात आलेला आहे.
झेरो इन्व्हेस्टमेंट इनोवेसन फॉर एज्युकेसन दिल्ली या संस्थेद्वारा सदर सन्मान यांना देण्यात आलेला आहे.डॉ सुजित टेटे यांच्या शिक्षण क्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन चे सदस्यत्व प्रदान केलेले असून विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान त्यांना मिळालेला आहे.यूनिटेड स्कुल असोसिएशनचे सदस्यत्व, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे चे सदस्तव, ऑल इंडिया टीचर वेल्फेअर असोसिएशन चे सदस्तव, अर्थ फेडरेशन चे सदस्तव आणि यूनिटेड नॅशन वेलेंटीअर सदस्तव अशा विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य आहेत.देवरी च्या ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये मागील 10 वर्षा पासून प्राचार्य डॉ.सुजित टेटे अध्यापनाचे कार्य करीत असून त्यांना मिळविलेल्या यशाचे सर्वस्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
सदर यशाचे श्रेय आपले शिक्षक, कुटुंबीय, सहकारी आणि मित्रांना दिले.