30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय आ.रहागंडालेंचा तिरोड्यात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

आ.रहागंडालेंचा तिरोड्यात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

0
88

तिरोडा,दि.04ः-विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार विजय रहागंडाले यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवडणुक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केला.आमदार रहागंडाले यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी कमलकुंज असाटी समाज भवन (प्रेमबंधन लानच्या मागे असाटी पेट्रोल पंप जवळ ) तिरोडा येथून पदयात्रेला सुरवात केली.ही पदयात्रा शहरातील मार्गभ्रमण करीत उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात पोचल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत तिरोड्याच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पालांदूरकर,माजी आमदार भजनदास वैद्य,स्वानंद पारधी,उमाशकंर हारोडे,गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार आदी उपस्थित होते.