30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ साकोलीतून काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंचा अर्ज दाखल,पटेलांची हजेरी

साकोलीतून काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंचा अर्ज दाखल,पटेलांची हजेरी

0
33

साकोली,दि.04ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे लोकनेते नानाभाऊ पटोले यांनी आज जनतेच्या साक्षीने व आशिर्वादाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पिरीपा, आरपीआय, स्वाभिमानी आघाडीतर्फे साकोली विधानसभा क्षेत्रातुन उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल,भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,साकोली,लाखांदूर व लाखनी तालुक्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरीपा, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व तालुका पदाधिकारी, नेतेमंडळी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.पटोलेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोच्या संख्येने समुदाय स्वयस्पुर्तीने साकोलीत उतरला होता.त्यामुळे चारही बाजुने गर्दीच गर्दी दिसून येत होती.