29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदु यांच्या तीनही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेटी

सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदु यांच्या तीनही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेटी

0
42
  • निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा
  • कारंजा, रिसोड येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षाची पाहणी

वाशिम, दि. ०5 : सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांनी  कारंजा, वाशिम व रिसोड या तीनही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय कार्यालयांना भेट देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कारंजा व रिसोड येथील ईव्हीएम सुरक्षा काक्षाचीही यावेळी त्यांनी पाहणी केली.कारंजा येथील भेटीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, वाशिम येथील भेटीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे व रिसोड भेटीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. बिंदू यांनी यावेळी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली, तसेच नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेच्या पूर्वतयारीचाही आढावा घेतला. यावेळी श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी तथा पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे उपस्थित होते.