अर्जुनी मोर,दि.04ः-उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी ( दि.4 )अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रासाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या शेकडो समर्थकांचे शक्तीप्रदर्शन करीत आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपा – शिवसेना, आरपिआय ( आ.) महाआघाडीचे उमेदवार ईंजी. राजकुमार बडोले यांनी दुर्गा चौक अर्जुनी मोर. येथून हजारो समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनाद्वारे विशाल रॅली काढली. शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत राजकुमार बडोले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी मोर येथे निवडणुक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांचे कडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार रमेश कुथे होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यांच्यासोबत माजी आमदार राजेंद्र जैन, बँकेचे संचालक प्रमोद लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर,देवचंद तरोणे,नरेश भेंडारकर,अविनाश काशीवार,लोकपाल गहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.तिकडे युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष निशांत राऊत यांनी आघाडीच्या विरोधात जात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.




