26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ महाविद्यालयीन युवक-युवतींनी समजून घेतली मतदान प्रक्रिया

महाविद्यालयीन युवक-युवतींनी समजून घेतली मतदान प्रक्रिया

0
33
  • ईव्हीएम-व्हीव्हीपॅट विषयी जनजागृती
  • फिरत्या अभिरूप मतदान केंद्रात झाले मतदान
  • ‘सेल्फी बूथ’लाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

वाशिम, दि.०६ : नवमतदार, दिव्यांग व महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये फिरत्या अभिरूप मतदान केंद्राद्वारे अभिरूप मतदान प्रक्रिया राबवून येथील युवा, नवमतदारांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची कार्यपद्धती समजावून सांगितली जात आहे.

शुक्रवारी मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अशा प्रकारे अभिरूप मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्यने सहभागी होवून ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी ‘स्वीप’चे सहाय्यक नोडल अधिकारी तथा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, प्राचार्य भोंडे, प्रा. इंगळे आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘सेल्फी बूथ’ लावण्यात आले होते. यावेळी सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सेल्फी बूथला भेट देवून सेल्फी काढून मतदान जागृतीचा संदेश दिला.