26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ छाननीअंती जिल्ह्यात ६० उमेदवारांचे अर्ज वैध;०३ जनांचे अर्ज ठरले अवैध

छाननीअंती जिल्ह्यात ६० उमेदवारांचे अर्ज वैध;०३ जनांचे अर्ज ठरले अवैध

0
28

वाशिम, दि. ०६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच ४ ऑक्टोंबरपर्यंत ६३ उमेदवारांनी ९२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये तीनही मतदारसंघातील प्रत्येकी एका उमेदवाराचे अर्ज अवैध ठरले असून छाननीअंती जिल्ह्यातील ६० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.३३-रिसोड विधानसभा मतदारसंघात २५, ३४- वाशिम (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात १६ आणि ३५- कारंजा विधानसभा मतदारसंघात १९ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

३३- रिसोड विधानसभा मतदारसंघ : अमित सुभाषराव झनक (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विजयकुमार वामनराव उल्हामाले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), शे. ख्वाजा शे. फरीद (बहुजन समाज पार्टी), सानप विश्वनाथ आश्रुजी (शिवसेना), दत्तराव भिकाजी धांडे (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद ऊल मुसलमीन), दिलीप रामभाऊ जाधव (वंचित बहुजन आघाडी), प्रशांत उत्तमराव गावंडे (संभाजी ब्रिगेड), बबनराव तुकाराम मोरे (किसान समाज पार्टी), राजेश श्रीकृष्ण अंभोरे (बहुजन विकास आघाडी), अनिल रंगराव घुगे (अपक्ष), अनंतराव विठ्ठलराव देशमुख (अपक्ष), गजानन श्रीपतराव पाटील (अपक्ष), चेतनकुमार वामनराव इंगळे (अपक्ष), जानकीराम बंडूजी डाखोरे (अपक्ष), तव्वसर खान गुलाम गौस खान (अपक्ष), प्रशांत विष्णू बकाल (अपक्ष), प्रशांत सुधीर गोळे (अपक्ष), महादेव पांडुरंग मुसळे (अपक्ष), डॉ. राजीव नंदकिशोर अग्रवाल (अपक्ष), डॉ. राधाकिसन मधुकरराव क्षीरसागर (अपक्ष), विजय तुळशीराम जाधव (अपक्ष), विश्वनाथ तुकाराम शेवाळे (अपक्ष), शेख अख्तर शेख अफसर (अपक्ष), सुनील श्रीपतराव पाटील (अपक्ष), सोनाली प्रकाश साबळे (अपक्ष).

३४- वाशिम (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ : दिलीप पांडुरंग भोजराज (बहुजन समाज पार्टी), भारत लक्ष्मण नांदुरे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), रजनी महादेव राठोड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), लखन सहदेव मलिक (भारतीय जनता पार्टी), महादा आश्रू हिवाळे (विदर्भ माझा पार्टी), राहुल जयकुमार बलखंडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), सिद्धार्थ आकारामजी देवळे (वंचित बहुजन आघाडी), सौरभ रवींद्र गायकवाड (बहुजन मुक्ती पार्टी), संतोष बन्सी कोडीसंगत (प्रहार जनशक्ती पार्टी),  पेंढारकर शशिकांत यशवंतराव (अपक्ष), भागवत सखाराम रणबावळे (अपक्ष), भालेराव दीपक रमेश (अपक्ष), मदन रामेत पवार (अपक्ष), सुरेश प्रकाश राजगुरू (अपक्ष), सुरेश भिवाजी इंगळे (अपक्ष), सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर (अपक्ष).

३५- कारंजा विधानसभा मतदारसंघ :  प्रकाश उत्तमराव डहाके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), राजेंद्र सुखानंद पाटणी (भारतीय जनता पार्टी), मो. युसुफ मो. शफी पुंजानी (बहुजन समाज पार्टी), डॉ. सुभाष पांडुरंग राठोड (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), आदेश रामभाऊ गवई (बहुजन मुक्ती पार्टी), करीम सत्तार शेख (राष्ट्रीय ओलमा कौन्सिल), मनीष दामोदर मोडक (प्रहर जनशक्ती पक्ष), माणिक महादेवराव पावडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), मुरलीधर लालसिंग पवार (विकास इंडिया पार्टी) पुरुषोत्तम नागोजी ठोंबे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -रिफॉर्मीस्ट), डॉ राम शेषराव चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), कॉ. रामकृष्ण पुंडलिकराव सावके (सी. पी. आय. (एम.एल.) रेडस्टार), अण्णासाहेब उत्तम रोडगे (अपक्ष), गजानन काशिनाथ अमदाबादकर (अपक्ष), गजानन रामजी पवार (अपक्ष), चंद्रकांत सुभाषराव ठाकरे (अपक्ष), दिगंबर नरेंद्र चव्हाण (अपक्ष), भगवान करपाजी साबळे (अपक्ष), विनोद पंजाबराव नंदागवळी (अपक्ष).