35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ गडचिरोलीमध्ये प्रत्येक मतदार संघासाठी 2 निवडणूक निरिक्षक

गडचिरोलीमध्ये प्रत्येक मतदार संघासाठी 2 निवडणूक निरिक्षक

0
29

खर्चावर सनियंत्रणासाठी अतिरीक्त अजून एक : एकुण सात निवडणूक निरीक्षक

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयामध्ये निवडणूक आयोगाकडून तब्बल सात निवडणूक निरिक्षकांची नेमणूक निवडणूक आयोगाने केली आहे. प्रत्येक मतदार संघासाठी जनरल 1 व पोलीस 1 अशा दोन आय.ए.एस. व आय.पी.एस.दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त संपुर्ण जिल्हयासाठी अतिरीक्त एक खर्च निरीक्षक नेमण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाते.

सर्व निवडणूक निरिक्षक जिल्हयात दाखल झाले असून निवडणूक तयारीबाबत कामकाज पाहणे सुरू झाले आहे. त्यांचे  राहण्याचे ठिकाण व संपर्क क्रमांक पुढिलप्रमाणे आहे.

क्र. विधानसभा निरीक्षकाचा प्रकार नाव संपर्क क्रमांक भेटण्याचे ठिकाण
1 आरमोरी जनरल

 

आर.एस.धिल्लन

IAS

 

7588589355

 

शासकिय विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली
पोलीस युरिंदर सिंग

IPS

8275136355  पोलीस विश्रामगृह गडचिरोली
2 गडचिरोली जनरल

 

प्रविण गुप्ता

IAS

 

8275404375

 

शासकिय विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली
पोलीस हिंगलजदन

IPS

8275890375 पोलीस विश्रामगृह गडचिरोली
3 अहेरी जनरल

 

वीआरके तेजा

IAS

9405992709

 

वन विभाग, विश्रामगृह, गडचिरोली
पोलीस लव कुमार

IPS

9405990195 वन विभाग, विश्रामगृह, गडचिरोली
4 सर्व 3 विधानसभा खर्च अभ्र घोष

IDAS

8275237155

 

शासकिय विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली

 

संबंधित निवडणुक निरिक्षकांनी नागरीकांना भेटण्यासाठी सकाळची वेळ 9.00 ते 11.00 देण्यात आली आहे. त्यांचे कार्य फिरतीचे असल्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की दिलेल्या संपर्क क्रमांकावर खात्री करून भेटण्यास यावे.

सर्वसाधारण(जनरल) निरीक्षक : उमेदवारांची नामनिर्देशने दाखल झाल्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी सर्वसाधारण(जनरल) निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आयएएस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पोलीस निवडणूक निरीक्षक:  निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी आयपीएस (इंडियन पोलिस सर्व्हिस) दर्जाचे पोलिस निवडणूक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने या निरीक्षकांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.

खर्चविषयक निरीक्षक : उमेदवार आणि पक्षांच्या निवडणूकविषयक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी IDAS (Indian Defense Accounts Service) दर्जाचे खर्चविषयक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघासाठी हे निरीक्षक काम बघतील. निवडणुकीतील बेकायदा खर्च रोखण्याच्या दृष्टीने यांची भूमिका महत्त्वाची ठरते.

blank