25.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ तिरोडा येथे निवडणूक निरीक्षक मेहता नागरीकांशी भेटणार

तिरोडा येथे निवडणूक निरीक्षक मेहता नागरीकांशी भेटणार

0
28

गोंदिया दि.6 : भारत निवडणुक आयोगाने तिरोडा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक राजीव मेहता (7820877981) हे तिरोडा येथील जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे भेटीसाठी उपलब्ध राहणार आहे. श्री. मेहता हे 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राजकीय पक्ष व उमेदवारांशी भेट घेवून त्यांच्या निवडणूक विषयक अडचणी जाणुन घेतील. तिरोडा मतदारसंघातील नागरीकांनी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा किंवा वॉट्सॲपवर माहिती दयावी.तसेच सी व्हीजील ॲपवर देखील नागरीक आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय श्री. मेहता गोंदिया येथील विश्रामगृह येथे देखील भेटीसाठी उपलब्ध असतील.