27.9 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश संख येथे विषारी साप चावल्यामुळे तरूणाचा मृत्यू

संख येथे विषारी साप चावल्यामुळे तरूणाचा मृत्यू

0
28

संख(राजेभक्षर जमादार)दि.06ः- जत तालुक्यातील संख  येथील विलास रेवणसिद्ध कदम (वय २३)या मुलाचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना संख पासून पाच किलोमीटरवरील संख मध्यम प्रकल्पाच्या रस्त्यालगतच्या त्याच्या शेतात घडली.विलास हा आयटीआयचे शिक्षण संपवून पुणे येथे कंपनी मध्ये नोकरीला होता. दसऱ्यानिमित्त आठ दिवस सुट्टी घेऊन संख येथे आला असता  शेतातील तुरीवर औषध  फवारण्यासाठी स्वतः गेला होता. शनिवारी शेतात तुरीवर औषध मारत असताना सायकांळच्या सुमारास विषारी सापाने चावा घेतला त्यात त्याचा मृत्यू झाला.त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे .त्याच्या मृत्यूवने संख सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.