27.9 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ कास्ट्राईब शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार

कास्ट्राईब शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार

0
53

गोंदिया,दि.07 : जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भाने कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अति. राज्य सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांचे नेतृत्वात मुख्य लेखा व वित्त अधिकारी शत्रुघ्न मसराम यांची ५ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अमृता परदेशी उपस्थित होत्या. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. गोंदिया यांनी मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.
कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया यांनी दिलेल्या निवेदनात, माहे सप्टेंबर २0१९ चे वेतन ८ ऑक्टोबर २0१९ धम्मचक्र दिनापूर्वी देण्यात यावे. सातवे वेतन आयोगाची वेतन निश्‍चिती अद्यावत करण्यासाठी पंचायत समितीमधून सेवा पुस्तिका पाठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे, डी.सी.पी.एस. शिक्षकांना सातवे वेतन आयोगाचा पहिला टप्पा रोखीने देण्यात यावा. शिक्षकांचा सातवे वेतन आयोगाचा पहिला टप्पा भविष्य निर्वाह निधीमध्ये अविलंब जमा करण्यात यावा. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी वेतन निश्‍चितीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावे. भविष्य निर्वाह निधी पावती दरवर्षी नियमित देण्यात यावी. सहावे वेतन आयोगाचे संपूर्ण हप्ते जमे झाल्याचा पावतीवर उल्लेख करण्यात यावा. डी.सी.पी.एस. शिक्षकांची कपात निधी डी.सी.पी.एस. खातेमध्ये करून पावती देण्यात यावी. भविष्य निर्वाह निधी पावती मिळाल्याची स्वाक्षरी प्रत शिक्षकांकडून घेण्यात यावी. सेवा नवृत्तीनंतर संगणक परीक्षा संदर्भातील कपात करण्यात येऊ नये. सेवानवृत्ती वेतन फाईल्स त्वरित निकाली काढण्यात यावी. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे जि.प. शिक्षकांना नक्षल भत्ता देण्यात यावा. सातवे वेतन आयोगाच्या शिफारशीन्वये १0, २0 व ३0 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारीत आश्‍वासीत प्रगती योजना दिनांक १ जानेवारी २0१६ पासून लागू लागू करणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी.
सेवानवृत्त शिक्षक सिद्धार्थ भोतमांगे यांची सातवे वेतन आयोग संदर्भातील वेतन निश्‍चिती करण्यात यावी. सेवानवृत्त मुख्याध्यापक गणेश हुकरे, मृतक शिक्षक पुनेकर मेर्शाम, सेवानवृत्त केंद्रप्रमुख युवराज येल्ले यांची भविष्य निर्वाह निधी व गटविमा राशी त्वरित देण्यात यावी. अशा विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी समस्यांची योग्य दखल घेऊन मुख्य लेखा व वित्त अधिकारी शत्रुघ्न मसराम यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळांना दिले. शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अति. राज्य सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, जिल्हा सरचिटणीस संजय उके, उमा गजभिये, राजेश साखरे, सिद्धार्थ भौतमांगे, सोमकांत भालेकर, विलास डोंगरे, विरेंद्र भोवते, अमित गडपायले, अजय शहारे, उत्क्रांत उके, अविनाश गणवीर, प्रदीप रंगारी यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.