27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home क्रीडा विजयपूर संघाने पटकावला कबड्डीस्पर्धेचा प्रथम पुरस्कार

विजयपूर संघाने पटकावला कबड्डीस्पर्धेचा प्रथम पुरस्कार

0
25

संख(राजेभक्षर जमादार)दि.07ः- येथील श्री हुडेद लक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ संखच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कबड्डीस्पर्धेत विजयपूर संघाने प्रथम क्रमांक पटकावत 21 हजाराचा पुरस्कार प्राप्त केला.तर व्दितीय क्रमांकावर कडलास संघ राहिला,या सघाला 15हजार रुपयाचा पुरस्कार देण्यात आला.अरवडे संघाने तृतीय पुरस्कार 11 हजार,वाळवा संघाने 7 हजाराचा चतुर्थ व हुडेद लक्ष्मी संघाने पाचवा पुरस्कार 5 हजार रुपयाचा पटकावला. या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरवात खेळाडूंसोबत मान्यवराच्या हस्ते हस्तांदोलन करून करण्यात आली.यावेळी  देवगोंडा बिरादार, सुरेश पाटील,युवा नेते सुभाष पाटील,मैनुद्दीन जमादार ,मल्लु बिरादार , तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.