32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय तुमसर मतदारसंघात खा.पटेलांच्या गुरुवारला प्रचारसभा

तुमसर मतदारसंघात खा.पटेलांच्या गुरुवारला प्रचारसभा

0
50

blank

तुमसर,दि.09ः-भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, आर. पी.आय., पी री पा. महागठबंधनचे अधिकृत उम्मेदवार राजु कारेमोरे यांच्या प्रचाराकरीता राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार प्रफुल पटेल उद्या गुरुवार(दि.10) यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.खा.पटेल हे महाआघाडीचे स्टारप्रचारक असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा त्यांच्यावर आहे.त्याअंतर्गत खा.पटेल हे गुरुवारला तुमसर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजु कारेमोरे यांच्या प्रचाराकरीता सकाळी 11.30 वाजता मांडेसर ता. मोहाडी,दुपारी 12.30  वाजता मोहाडी तालुका प्रचार कार्यालयाचे उदघाटन,दुपारी 2.30 वाजता बघेड़ा ता. तुमसर दुर्गा चौक,सायकांळी 4.30 वाजता आष्टी ता. तुमसर बाजार चौक,सायकांळी 6.30 वाजता सिहोरा ता. तुमसर बाजार चौक व रात्री 8 वाजता देव्हाडी ता. तुमसर दुर्गा मंदिर चौक येथे आयोजित सभांना मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार मधुकर कुकडे,काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत.यावेळी काॅंग्रेस, राकाँं,आरपीआय,पिरीपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

blank