साकोली,दि.09ःः साकोली विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस पिरिपा, आर.पि.आय.(गवई) महाआघाडीचे लोकप्रिय उमेदवार लोकनेते माजी खासदार नानाभाऊ पटोले व अर्जुनी/मोर.विधानसभा क्षेत्राचे महाआघाडीचे मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी आपल्या प्रचाराची सुरवात चारभट्टी येथील हनुमान मंदीरात पुजा-अर्चना करून केली.यावेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे,बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे,शेतकरी नेते ,किसान कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश काकडे,जय जवान जय किसान शेतकरी नेते प्रशांत पवार,शेतकरी कन्या व सामाजिक कार्यकर्त्या ऍड.मेघा रामगुंडे,माजी सभापती दामाजी खंडाईत,कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लीचडे,जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत,जिप सदस्य प्रदीपभाऊ बुराडे, जिप सदस्या प्रणालीताई ठाकरे,जिप सदस्य आकाशभाऊ कोरे,माजी जिप सदस्या व आदिवासी नेत्या भूमालाताई कुंभरे,साकोलीचे पस सभापती मदन रामटेके,प्रमिला कुंटे, देविदास राऊत उपसभापती बाजार समिती सभापती सुभाष राऊत,राजू निर्वाण,कांग्रेस तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावाडे,रांका तालुकाध्यक्ष बालुभाऊ चुन्ने ,मिलिंद शिवहगडे उपसरपंच विरली/बु. अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अविनाश काशिवार, लोकपाल गहाने, जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर,सविता ब्राम्हणकर,छाया पटले,वंदना पटोले,कल्पना जाधव,वैशाली हटवार यांच्यासह अनेक मान्यवरासह शेकडोच्या संख्येने समर्थकांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना नानाभाऊ म्हणाले की,आपण नेहमीच सर्वसामान्य नागरिकासांठी लढाई लढलेले आहे.ओबीसींच्या हितासाठी प्रश्न विचारल्यावर या देशातील सत्ताधीश त्याचा विरोध करतात,आता तर आमची जनगणनाही करत नाही,नोकरीत आम्हाला काही स्थान नाही.वैद्यकिय शिक्षणात आमचा हक्क डावलला गेला.आमचा शेतकरी आजही कर्जाच्या खाईत लोठला असून त्यांच्या मालाला कुठे आहे हमीभाव,कुठ गेली कर्जमाफी असे म्हणत सरकार या सर्व प्रश्नांना बगल देत भावनिक व देश धर्माच्या नावावर निवडणुका जिंकून सर्वसामान्य नागरिकांची फसवणुक करणार्यापासून सावध राहण्याची गरज आहे.भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्वच 7 जागावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी तनमनधनाने काम करायचे असून आपले मतभेद विसरा आणि पक्षाच्या विजयासाठी कार्य करा असा संदेश दिला.जोपर्यंत आपण उभा असलेला उमेदवार आपणच आहोत समजून काम करणार नाही,तोपर्यंत आपल्यात एकी येणार नाही,यासाठी मतभेद व मनभेद दुर करा आणि विजयाचा संकल्प करा असे म्हणाले.




