गोंदिया,दि.09ःःआय.यु.सी.एन. प्रकल्पाअंतर्गत भारतीय वन्यजीव न्यास तर्फे नागझिरा-नवेगाव बफर झोनमध्ये येणार्या गावात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थासाठी चित्रकला,निबंध स्पर्धा, पर्यावरण आधारीत चित्रपट व प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेच्या दृष्टीकोनातून चित्रकलास्पर्धा करीता वन व वन्यजीव विषय देण्यात आले. तसेच निंबध स्पर्धेकरिता वाघाच्या संवर्धनाचे महत्व हे विषय देण्यात आले होते. जनजागृती अभियानात २२२ विद्यार्थी सहभागी झाले.त्यातच स्पर्धेत प्रथम,व्दितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरित करण्यात आले.जनजागृती कार्यक्रमांतर्गत गावामध्ये शुद्धा गावकरीकरीता रांगोळी स्पर्धा, पर्यावरण व वाघाचे संवर्धन याआधारित लघुचित्रपट आणि प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. यात ११३० सहभागी झाले होते.
जनजागृती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पर्यावरण संवर्धनचे मुल्यमार्गदर्शक म्हणून विभोर चौधरी यांनी केले.यावळी सर्वानंद कवाश(सरपंच, सेरपार),योगराज हरीनखेडे(पोलिस पाटील, गोवारीटोला), सुभाष कुळमते(शारदा मंडळ अध्यक्ष, खडकी),संजय कापगते(शारदा मंडळ अध्यक्ष, लेंडेझरी),अशोक ठलाल(सरपंच, दल्ली),जनबंधू(बाळासाहेब तिरपुडे महाविद्यालय, शेंडा) आणि ताजने (जि.प. प्राथ. शाळा, मुरदोली),आयोजक म्हणून भारतीय वन्यजीव न्यासचे हिवराज राऊत, नितिन रावते, जितेंद्र कटरेव नूर अली उपस्थित होते.




