गोंदिया-शिवप्रतिष्ठान हिंदोस्थान जिल्हा गोंदिया तर्फे नेहरू चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विजयादशमीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान कार्यक्रमात शस्त्रपूजा करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिकांना अल्पोहराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात विनोद अग्रवाल यांनी उपस्थित राहून शिवछपत्रपतींचा आशीर्वाद घेतला.विनोद अग्रवाल यांनी शस्त्रपूजा करत विजयादशमीला खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केले असल्याचे संदेश जनतेला दिला. यावेळी पंकज यादव, सोनू चंद्रवंशी, हर्षल पवार, आदेश शर्मा, भरत क्षत्रिय, पूजा तिवारी, सुषमा यदुवंशी, जयराम जचपेले, अनुप माणिकपुरी या सारखे मंडळी उपस्थित होते.




