
तुमसर,दि.10ः- भंडारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य डाॅ.युवराज जमईवार,तुमसर भाजप तालुकाध्यक्ष राजेश पटले व तुमसर शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे यांना पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष इंजि.प्रदिप पडोळे यांनी सहा वर्षासाठी पक्षातून निलबिंत केले आहे.पडोळे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात तिन्ही पदाधिकार्यानी सोशल मिडियावर अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराची धुरासांभाळत पक्षविरोधी काम केले असून पक्षाच्या अधिकृत उमेदावराच्या प्रचाराला हजेरी लावली नसल्याने निलबिंत करण्यात आल्याचे म्हटले आहे.





