29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ राँका-काँग्रेसच्या सयुंक्तसभेत अमर वराडेना विजयी करण्याचे आवाहन

राँका-काँग्रेसच्या सयुंक्तसभेत अमर वराडेना विजयी करण्याचे आवाहन

0
40

गोंदिया,दि.११ः- गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सयुक्त झालेल्या सभेत गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमर वराडे यांनी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाची गरज असून आपल्या सहकार्याने व परिश्रमानेच ही निवडणुक धनाड्याबरोबर लढून जिकांयची आहे.त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करुन मतभेद बाजुला सारुन आघाडीची असलेली ही जागा आघाडीला विजयाच्या रुपात आणण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक शहारे यांनी प्रास्तविक केले.सभेला प्रदेश काँग्रेस सचिव विनोद जैन,माजी जि.प.अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,राष्ट्रवादीचे देवेन्दनाथ चौबे,राँका जिल्हाउपाध्यक्ष शिव शर्मा,शहर काँग्रेस प्रभारी पृथ्वीपालqसह गुलाटी,आशा पाटील,केतन तुरकर,मयुर दरबार,जहिरभाई,आलोक मोहंती,जंयत कछवाह,राकेश वर्मा,विनायक खैरे,संदिप पटले,गणेश डोये,राजेश दवे,गोपालराव कापसे,गजानन लिल्हारे,विनित सहारे,मनोहर वालदे,रमन उके,लता रहागंडाले,कुंदा दोनोडे,दिपक पटले,विशाल शेंडे,सुदर्शना वर्मा,हरबक्ष गुरनानी,शकील शेख,नागो बनसोड,सुभाष फुंडे,वामन गेडाम आदी उपस्थित होते.