29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ तिरोडा मतदारसंघात राँका उमेदवार बोपचेंची पदयात्रा

तिरोडा मतदारसंघात राँका उमेदवार बोपचेंची पदयात्रा

0
48

गोरेगाव/तिरोडा,दि.,दि.११ः-  तिरोडा विधानसभा मतदारसंघातील कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, आर. पी.आय., पी री पा. महागठबंधनचे अधिकृत उम्मेदवार रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रचाराकरीता राष्ट्रवादीचे तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभांचा सपाटा सुरु केलेला आहे.गोरेगाव येथे माजी नगराध्यक्ष सीमा राहुल कटरे यांच्या नेतृत्वात आज प्रभाग क्र.4 मध्ये पदयात्रा काढण्यात आली.त्यापुर्वी राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस, आर. पी.आय., पी री पा गठबंधन चे अधिकृत उम्मीदवार रविकांत (गुड्डू) खुशाल बोपचे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन गोरेगाव येथे करण्यात आले.यावेळी माजी खासदार डॉ खुशाल बोपचे,माजी आमदार राजेन्द्र जैन,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पी.जी.कटरे,माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश येरोला,वरिष्ठ काँग्रेस नेता सी टी चौधरी,तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र राहंगडाले,पंचायत समिती सदस्य केवल बघेले,बाजार समितीचे संचालक श्रीप्रकाश राहंगडाले, मलेश्याम येरोला, महेंद्र चौधरी, रामूजी हरिनखेड़े, प्रदीप जैन, अनिता तुरकर, भेजराज चौहान, नीरज धमगाये, राहुल कटरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक,कार्यकर्ता उपस्थित होते.तिरोडा तालुक्यातील गावामध्ये आयोजित पदयात्रेतजिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.योगेंद्र भगत,तालुका काँग्रस अध्यक्ष राधेलाल पटले,जिल्हामहिलाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,राँका तालुकाध्यक्ष प्रेम रहागंडाले,मनोज डोंगरे,डाॅ.किशोर पारधी,सभापती वीणा रहागंडाले,जि.प.सदस्या वीणा बिसेन यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत.