43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 

तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 

0
24
????????????????????????????????????

blank

  • सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांची उपस्थिती

वाशिम, दि. ११ : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात वितरीत करण्यात आलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटची दुसरी सरमिसळ प्रक्रिया सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांच्या उपस्थितीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पार पाडली.वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया ९ ऑक्टोंबर रोजी, तर रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ १० ऑक्टोंबर रोजी झाली. यावेळी वाशिमचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, कारंजाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, रिसोडचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार तसेच संबंधित मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार उपस्थित होते.

पहिल्या सरमिसळ प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र संख्येच्या १२६ टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि १३० टक्के व्हीव्हीपॅटचे वाटप यापूर्वीच करण्यात आले होते. तिन्ही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर झालेल्या मतदान यंत्रांच्या दुसऱ्या सरमिसळ प्रक्रियेद्वारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट जोड्या तयार करण्यात असून ही मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रांवर पाठविली जातील, हे निश्चित करण्यात आले आहे. लवकरच संबंधित विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे मतदानासाठी सज्ज करण्याची (सिलिंग) ची कार्यवाही केली जाणार आहे

blank