25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ बडोलेंच्या प्रचारसभांना मतदारांचा प्रतिसाद

बडोलेंच्या प्रचारसभांना मतदारांचा प्रतिसाद

0
22

अर्जुनी मोरगाव,दि.12ः- भाजपा-शिवसेना-आरपीआय (आ) व मित्रपक्ष महायुतीच्या भाजपाचे उमेदवार इंजि. राजकुमार बडोले यांचा प्रचार सभा व रोड शोचे आयोजन तालुक्यातील अनेक गावात करण्यात आले होते. या सभा व रोड शोला जनतेचा उत्स्र्फूत प्रतिसाद लाभला.
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील सोमलपुर, परसोडी/रे, बाक्टी/बिडटोला, पांढरवाणी/रे., बोरटाला, पांढरवानी/माल, सावरटोला, खोलीग्राम, चापटी, चान्ना/कोडका, ब्राम्हणटोला, नवेगावबांध, बाराभाटी, मुंगली, कुंभीटोला, मुंगलीटोली, बोळदे, भुरसीटोला, कवठा, डोंगरगाव, भिवखिडकी, देवलगाव, सिरेगांव, पंचवटी, गुढरी, येरंडी येथे राजकुमार बडोले यांच्या प्रचार सभा व रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बडोले यांनी भाजप सरकारच्या ग्रामीण जनतेसाठी राबविलेल्या विविध योजना, विकास कामांची माहिती देऊन गत पाच वर्षात अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात झालेल्या विकास कामांंना पुढे नेण्यासाठी जनतेचे आशिर्वाद मागितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रमेश कुथे, रघुनाथ लांजेवार, नवेगावबांधचे सरपंच अविनाश शहारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.