25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home क्रीडा शालेय शुटिंगस्पर्धेत आदित्य जगतापची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय शुटिंगस्पर्धेत आदित्य जगतापची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

0
37

नागपूर,दि.12ः- नागपूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गंत आयोजित विभागीय शालेय शूटिंग स्पर्धा 2019 च्या 14 वयोगटातील खुल्या शुटिंगस्पर्धेत मुळचा गोंदिया निवासी असलेला भवन्स विद्यालय कोराडीचा विद्यार्थी आदित्य अनंत जगताप यांने 300 अंक प्राप्त करीत विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याने राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.याच स्पर्धेत विभागस्तरावर अभिषेक मोरे लोकमान्य तिलक विद्यालय चंद्रपूर व्दितीय,कविश गौर नारायण विद्यालय चंद्रपूर तृतीय व कुलदिप वाघमारे विद्यानिकेत चंद्रपूर याने विभागीय स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला.ही स्पर्धा नागपूर येथे पार पडली. आदित्य जगताप हा नागपूर येथील orange city sport शूटिंग academy येथे शूटिंगचे धड़े घेत आहे.