28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ विदर्भ साहित्य संघाचा विजयादशमी उत्सव साजरा 

विदर्भ साहित्य संघाचा विजयादशमी उत्सव साजरा 

0
33
गोंदिया,दि.12 :  विदर्भ साहित्य संघ व मित्र मंडळ तर्फे पद्म नारायण बापट लॉन येथे वियादशमीनिमीत्त स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.  विदर्भ साहित्य संघ गोंदिया शाखेचे अध्यक्ष यशवंत सरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून पत्रकार जयंत शुक्ला होते. मंचावर  प्रामुख्याने सुमंत नातू, सचिव प्रदीप व्यवहारे, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा लिंक व्यवस्थापक उदय खरडणवीस, कवी कुमार कोकणे, कवी चैतन्य मातुरकर होते.   या प्रसंगी जयंत शुक्ला यांनी विजयादशमी उत्सवाचे  महत्व व वर्तमान परिस्थितीवर माहिती देत सत्याचा नेहमीच असत्यतेवर विजय होत असल्याचे  सांगितले. अध्यक्ष सरुळकर यांनी विदर्भ साहित्य संघ व मित्र मंडळातर्फे विजयादशमीचा कार्यक्रम मागील पंच्याहत्तर वर्षापासून निरंतर सुरु असल्याचे सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी  कवी चैतन्य मातुरकर व कुमार कोकणे यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.  कार्यक्रमाचे संचालन कुमार कोकणे यांनी तर आभार प्रदर्शन चैतन्य मातुरकर यांनी केले.  या वेळी कार्यक्रमात प्रामुख्याने लक्ष्मणराव बेडेकर, चंद्रशेखर तेलंग, अजय जोशी, उदय राजनकर, ऍड वसंत चुटे, मोहन देशपांडे, प्रकाश उमाळकर, गौरव धोटे, संजीव बापट, नितीन गोखले, अतुल देशपांडे, उदय निगुडकर आदी उपस्थित होते.