
गोंदिया दि. १२ :– केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात व राज्यात सर्वांगीण विकास होत आहे. गरिब, शेतकरी, युवा, महिला, वंचितांसाठी अनेक कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून पाच वर्षात मोठा परिवर्तन घडून आलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने गोंदिया क्षेत्रात भाजप-सेना-रिपाई महायुतीचा ऐतिहासिक विजय निश्चित असून राज्याला पुढे नेण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महायुतीची सत्ता स्थापित होणार असल्याचे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय महासचिव, महाराष्ट्र प्रभारी खा. सरोज पांडे यांनी केले.
पवार सांस्कृतिक सभागृहात ९ ऑक्टोबर रोजी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. या वेळी प्रामुख्याने भाजपा-सेना-रिपाई(आ.) महायुतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, रचना गहाणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, मौसम हरिणखेडे, उमादेवी अग्रवाल, शहर अध्यक्ष सुनील केलनका, नंदकुमार बिसेन, पंकज रहांगडाले, दीपक कदम, दिनेश दादरीवाल, भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, गणेश हेमने, मैथुला बिसेन, मौसमी सोनछात्रा, वर्षा खरोले, अफसाना पठाण, हेमलता पतेह, रिशीकांत साहू, अमृत इंगळे, शालिनी डोंगरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पांडे म्हणाल्या कि पार्टी मध्ये उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र पक्ष ज्यांना उमेदवारी देतो त्यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते कार्य करतात. पार्टी आपली आई आहे. महायुतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल हे सतत जनतेची सेवा करीत आहेत. क्षेत्राच्या विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या कार्यांना प्रभावित होऊन भाजप मध्ये आलो असून आता आपल्या आशीर्वादाने गोंदिया विधानसभा क्षेत्राचा विकासाची गती मोठ्या वेगाने वाढणार असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष पटले,मौसम हरिणखेडे, भावना कदम, अशोक इंगळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त्त केले. संचालन राजेश चतुर यांनी केले.
या पूर्वी राष्ट्रीय महामंत्री सरोज पांडे यांनी शहरातील गौतमनगर येथे महिला बचत गट मेळाव्याला भेट देऊन त्यांना भाजप सरकार द्वारे सुरु असलेल्या योजनांची माहिती दिली. या नंतर सिंधी कॉलनी येथे सिंधी समाजातील मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.




