अर्जुनी-मोर,दि.12ः-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ई सापूर हे गाव संपूर्ण अंधारात आहे आज दिनांक 12 ऑक्टोबरला या गावात उभारण्यात आलेल्या नवीन डीपीचे कनेक्शन जोडणी करतांनी लाईनमन व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांना कसलीही माहिती न दिल्याने अचानकपणे जुन्या डीपी वरील कनेक्शन काढून नवीन डीपी वर जोडून कनेक्शन चालू केला असता उच्च दाबाच्या झटक्याने घरोघरीं विद्युत उपकरणे जळाली तसेच लाईट सुद्धा उडाले टीव्ही फ्रिज पंखे व इतर विद्युत उपकरणे जळाल्याने तसेच गावातील रस्ता लाईट निकामी झाल्याने संपूर्ण गावाला अंधारात वास्तव्य करण्यास लागत आहे नवीन डीपीवर कनेक्शन लावतानी गावकऱ्यांना सूचना देऊन आपल्या घराची विद्युत उपकरणे बंद ठेवण्याची सूचना दिली असती तर विद्युत उपकरणे जळाली नसतील लाईनमन व त्यांच्या सहकार्याने हे न केल्याने ईसापुर गावातील नागरिकांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाली आहे तसेच रस्त्याची लाईट गेल्याने अंधारात वास्तव्य करावा लागत आहे अशा निष्काळजी लाईनमन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मागणी ग्रामस्थ करत आहेत.




