26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ तिरोड्यात राँका उमेदवार रविकांत बोपचेंच्या प्रचार कार्यालयाचे पटेलांचे हस्ते उदघाटन

तिरोड्यात राँका उमेदवार रविकांत बोपचेंच्या प्रचार कार्यालयाचे पटेलांचे हस्ते उदघाटन

0
28

तिरोडा,दि.१३ः- तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-रिपाई महाआघाडीचे उमेदवार रविकांत(गुड्डू)बोपचे यांच्या निवडणुक प्रचार कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाड़े,माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी आमदार राजेन्द्र जैन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,काँ्रग्रेस तालुकाध्यक्ष राधेलाल पटले,रुबीना मोतीवाला,अजय गौर,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अविनाश जैस्वाल,राष्ट्रवादीचे नेते डॉ.सुशील रहागंडाले,नरेश कुंभारे,ममता बैस,राजू केशरवानी,जफरबेग मिर्जा,भाऊदास जांभुळकर,राजकुमार भेलावे,राजू एन.जैन,प्रभु पटले, वंदनाताई चौहान,धमेंद्रसिंह चौहान,पूनम राहंगडाले, वसंतराव हुमने, नरेश धुर्वे,थानqसह रहागंडाले,टल्लू पारधी,सुरेश धुर्वे,जगदिश कटरे,गजानन बारापात्रे,प्रशांद डहाट,बबलू बैस,जि.प.सदस्य मनोज डोंगरे,तालुकाराँकाध्यक्ष प्रेम रहागंडाले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थति होते.
प्रचार कार्यालयाच्या उदघाटनापुर्वी बोलतांना माजी खासदार कवाडे म्हणाले की,सध्याचे सरकार हे विकास आणि सqवधानाच्या विरुध्द चालणारे सरकार असून विरोधात बोलणाèयांच्या आवाजदाबण्यासाठी काम करणारे सरकार आहे.जे सरकार भारताला लोकशाही मिळवून देणाèया सqवधनाला जाळले जाते,तेव्हा गप्प बसते ते सरकार सqवधानाचे रक्षण करणारे राहू शकत नाही असे विचार यावेळी माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.यावेळी माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे यांनीही विचार व्यक्त केले.
संपूर्ण कर्जमाफीची गरज असतांना युती सरकारने कर्जमाफी दिली नाही. शेतकरी हतबल झाला आहे. आमचे सरकार सत्तेत आल्यास शेतकèयांना संपूर्ण कर्जमाफी देऊ असे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे तिरोडा मतदार संघातील उमेदवार रविकांत (गुड्डू)बोपचे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी हतबल आहे. युवकांना रोजगार नाही, गॅस, वीज बिलाचे भाव वाढत आहेत. डिझेल आणि खताचे भाव वाढविले. मात्र दुधाचे भाव वाढत नाही. जीएसटी लावली. पेट्या वाटून जनतेला मुर्ख बनविण्याचे काम सुरु आहे. जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न आहे. पुढारीच रेतीचा व्यवसाय चोरट्या मार्गाने करीत आहे. महिलांचा अपमान करणारे बाहेर सभा लावून हिरोगिरी करीत अशा अनेक कारणांमुळे जनतेत संताप निर्माण झाला असून या सारकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.