26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ जगाला नमवण्याचे काम धम्मच करु शकतो;युवराज गंगाराम

जगाला नमवण्याचे काम धम्मच करु शकतो;युवराज गंगाराम

0
22

अर्जुनीमोरगाव ,दि.13ः-जगात बुद्धांचा धम्म हाच इतर धर्मापेक्षा स्वयंशासीत आहे, याला कोणताही उत्तराधिकारी नाही, कोणीही गुरु-शिष्य नाही, म्हणूनच माणूसकी हा बुद्धांचा धम्म या जगाला तारण्याचे काम करु शकतो असे प्रतिपादन नामवंत कवि व पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा युवराज गंगाराम यांना केले आहे.

यावेळी विचार मंचावर गुलबास जांभूळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी जागतिक धम्म परिषदेचे अध्यक्ष एच आर लाडे, आंबेडकरवादी साहित्याचे अभ्यासक प्रमुख मार्गदर्शक प्रा. मुन्नाभाई नंदागवळी, नवीन फुल्लुके, प्रभाकर दहिकर, सत्कारमुर्ति सुरेंद्र ठवरे, सरपंच उईके आदी उपस्थित होते.मृतगंध कुटी बौद्ध विहार समिती देऊळगाव आयोजित करण्यात आला असून थायलंडच्या मुर्तीनिमित्त ठवरे यांचे शाल श्रीफळ देऊन देवून सत्कार करण्यात आला, यावेळी जांभूळकर, ठवरे, दहिकर, तसेच नंदागवळी यांनी मार्गदर्शन केले.मानव मुक्तीच्या कल्याणासाठी नव युगाला धम्म हा मार्गक्रमण करतो, माणवाचे चिरंतर उद्धारक तथागत बुद्धच करतात, कारण बुद्ध हे मोक्षदाता नसून मार्गदाता आहेत, व कल्याणकारी महामानव असल्याचे हे जग साक्ष आहे.असे प्रास्ताविक मार्गदर्शनातून आपले मत व्यक्त केले आहे.कार्यक्रमाचे संचालन मनोज नंदेश्वर यांनी करुन आभार प्रदिप ढवळे यांनी मानले. यशस्वितेसाठी अध्यक्ष पुरुषोत्तम जांभूळकर, सचिव मनोज नंदेश्वर, पवन जांभूळकर, नेपाल बडोले, दिपक जांभुळकर,रोहीत ढवळे, अमोल बडोले यांनी परिश्रम केले.