गोंदिया,दि.15: गोंदिया विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले युवा स्वाभिमानचे उमेदवार जितेश राणे यांनी मतदार संघात पदयात्रा व नुक्कड सभांच्या माध्यमातून प्रचारात रंगत आणली असून गेल्या २७ वर्षापासून विकासाच्या नावावर मतदार संघाला विकासापासून दूर ठेवणाèयांना हाकलून लावण्याचा स्वाभिमान जागविण्याचे वेळ असल्याची भूमिका प्रचार सभांमधून व्यक्त केली आहे. मतदार संघातील दासगाव, कामठा, काटी, वडेगाव, रावणवाडी, फुलचूर, दतोरा, सेजगाव, मुंडीपार, नागरा आदि गावांमध्ये आयोजित सभेतून त्यांनी मतदारांना आपण गेल्या पाच वर्षापासून संपर्कात राहून जनतेसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. राणे म्हणाले की गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा पाडा २७ वर्षापासून नागरिकांच्या कानात ऐकू येत असले तरी काम मात्र शुन्य आहे, युवकांना रोजगार नसून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्री दिवस कधीही विद्युत लाईन बंद केली जाते. रस्ते खराब असल्यामुळे अपघातात वाढ होवून लोक मृत्यूमुखी पडत आहेत. शाळेत शिक्षकांची कमी आहे. शासकीय कर्मचारी रोज आंदोलने करताना दिसतात. अंगणवाडी सेविका, पंचायत मध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने qचतीत आहेत. ओबीसी, बहुजनांच्या समस्यांचे ढिगारे लागले असून या सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. या सर्व मुद्यांवर विधानसभेत आवाज उठविणारा लोकप्रतिनिधी पाठविण्याची गरज असल्याचे म्हणाले. त्यांच्यासोबत जीवन शरणागत, शिव नागपुरे, सुनील भोंगाडे, राकेश टेंभरे, राहूल खोब्रागडे आदि सहकारी उपस्थित होते.




