गोंदिया,दि.15: गोंदिया विधानसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महाआघाडीचे उमेदवार अमर वèहाडे यांनी जनसंपर्क आणि पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटींना सुरुवात केली आहे. उमेदवार अमर वèहाडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन, काँग्रेसचे प्रदेश सचिन विनोद जैन, माजी जि.प. अध्यक्ष अॅड.के.आर.शेंडे, माजी समाज कल्याण सभापती राजेश नंदागवळी, विरेंद्र जायस्वाल, अॅड. योगेश अग्रवाल, पृथ्वीपालqसह गुलाटी,माजी कृषी सभापती जगदीश बहेकार, निलम हलमारे, राजीव ठकरेले, विशाल शेंडे यांच्यासह अनेक नेते पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. गोंदिया शहर तसेच ग्रामीण भागातील प्रचार सभेत काँग्रेस सरकार आल्यास सर्वांना न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी सोबतच मतदार संघाच्या विकासासाठी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद गजभिये यांनी अमर वèहाडे यांना आपला जाहीर समर्थन दिला आहे. अनेक सामाजिक संगठना व इतर संगठना त्यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे.




