29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ खाडीपार येथे जागतिक हातधुवा दिन साजरा

खाडीपार येथे जागतिक हातधुवा दिन साजरा

0
29

सडक अर्जुनी- पंचायत समिती, पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने गटविकास अधिकारी निर्वाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा खाडीपार येथे आज 15 ऑक्टोबर रोजी जागतिक हातधुवा दिन तसेच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे शालेय स्वच्छता सल्लागार भागचंद्र रहांगडाले तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक डी. आय. कटरे, विस्तार अधिकारी आरोग्य प्र. लोकेश कटरे, गटसमन्वयक राधेश्याम राऊत, समूह समन्वयक साखरे, सहायक शिक्षक श्री. बडोले, श्री. पटले, श्री. भोयर, सहायक शिक्षिका सौ. बेंदवार, श्री. पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय स्वच्छता सल्लागार श्री रहांगडाले यांनी हात धुवा दिन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी विस्तार अधिकारी आरोग्य श्री कटरे यांनी ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक पाटील यांनी तर आभार सहायक शिक्षक भोयर यांनी केले.