29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय गोंदिया तालुक्यातील काँग्रेसचे २३ पदाधिकारी पक्षातून निलंबित

गोंदिया तालुक्यातील काँग्रेसचे २३ पदाधिकारी पक्षातून निलंबित

0
35

गोंदिया,दि.15: गोंदिया विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेवाराच्या प्रचारात सहभागी न होता पक्षविरोधी कार्य केल्याप्रकरणी गोंदिया तालुक्यातील २३ पदाधिकाèयांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशावररुन पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यामध्ये जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, शिक्षण सभापती रमेश अंबुले, नगर परिषद गटनेता शकील मंसुरी, उपसभापती चमनलाल बिसेन, पं.स.सदस्य वनिता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचल, प्रकाश चिंतामन डहाट, जयप्रकाश बिसेन, प्रिया मेश्राम, हरिश्चंद्र कवाडे, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, सारंगकुमार भेलावे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, नगर परिषद सदस्य श्वेता पुरोहित, निर्मला मिश्रा, शिला राकेश ठाकुर, क्रांतीकुमार जायस्वाल, सुनील तिवारी, सुनील भालेराव, जिल्हा परिषद सदस्य विमल नागपुरे, विजय लोणारे, सुरजलाल महारवाडे, व पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांचा समावेश आहे.