गोंदिया,दि.15: युवा स्वाभिमान पक्षाचे गोंदिया विधानसभा मतदार संघाचे उमेदवार जितेश राणे यांच्या प्रचाराकरिता मंगळवारला मराठी अभिनेता रसीक राज यांच्या रोड शोचे आयोजन गोंदिया शहरात करण्यात आले होते. या रोड शोमध्ये रसीक राजला बघण्यासाठी गर्दी झाली होती. त्यानंतर राणे यांच्या प्रचारार्थ चुटीया व रावणवाडी येथे रसीकराज यांनी जाहिर सभा घेत युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार जितेश राणे, वाय.पी.येळे, मोतीलाल चौधरी,जिवनलाल शरणागत,जगदिश रहागंडाले,शिव नागपूरे,सुनिल भोंगाडे,राहुल खोब्रागडे,राकेश टेंभरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




