29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय शेतकèयांचे जीवन समृध्द करण्यासाठी भाजप कटीबध्द : बडोले

शेतकèयांचे जीवन समृध्द करण्यासाठी भाजप कटीबध्द : बडोले

0
28

– अर्जुनी मोर तालुक्यात ३० प्रचारसभा
अर्जुनी मोर,दि.16ः- गरिबी हटावच्या घोषणा काँग्रेसच्या काळात झाल्या; परंतु गरिबी हटली ती काँग्रेसच्या पुढा‍èयांची. जे ६० वर्षांत कामे झाली नाहीत ती कामे भाजपने ५ वर्षांत पूर्ण केलीत.  जलसंवर्धनाची कामे केलीत. शेती क्षेत्रात मूलगामी परिवर्तन केले पाहिजे. शेतकèयांना इंधन पुरवू शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. शेतक‍èयांचे जीवन समृध्द कसे होईल, यासाठी भाजप कटीबध्द आहे,  असे प्रतिपादन अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे भाजप-सेना-रिपाई युतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील मुरदोली, मुंडीपार, हेटी, बोरीटोला, पालेवाडा, महाजनटोला अशा एकूण ३० गावांत आयोजित प्रचारसभेत ते नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पुढे बडोले म्हणाले, आपल्या आशीर्वादाने गत दोन निवडणुकीत निवडून आलो. या दहा वर्षांत सेवा करीत विकासकामे केली. क्षेत्रातील कृषी, पर्यटन, रोजगार वाढीसाठी शासनाच्या विविध योजनांतंर्गत मोठा निधी खेचून आणला. पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने विकास प्रक्रियेला गती आली आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपल्या विभागासह अन्य विभागाच्या योजनांतून जिल्ह्यासह क्षेत्राचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत जनता यंदाही भाजप सरकारसोबत असल्याचे सकारात्मक चित्र अर्जुनी मोर क्षेत्रात आहे. यंदा पक्षाने पुन्हा संधी दिली, विश्‍वास टाकला, पक्षाचा व जनतेच्या विश्‍वासाला यापुढेही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देत भाजप सरकारला पुन्हा निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन बडोले यांनी केले.अर्जुनी मोर मतदार संघातील ३० गावांतील प्रचारसभेत नागरिकांची मोठी गर्दी होती. दरम्यान बडोले यांनी पदयात्रा करीत नागरिकांशी संवाद साधला.