30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ 5 हजार 136 अधिकारी-कर्मचारी सांभाळणार मतदान पथकाची जबाबदारी

5 हजार 136 अधिकारी-कर्मचारी सांभाळणार मतदान पथकाची जबाबदारी

0
31

गोंदिया, दि.17 : जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान  होणार आहे. गोंदिया आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यत आणि आमगांव व अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत मतदान होणार आहे.अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघासाठी 1256 पुरुष आणि 8 महिला असे एकूण 1264 कर्मचारी, तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी 1172 पुरुष आणि 8 महिला असे एकूण 1180 कर्मचारी,  गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी 1353 पुरुष आणि 99 महिला असे एकूण 1452 कर्मचारी आणि आमगांव विधानसभा मतदारसंघासाठी 1232 पुरुष आणि 8 महिला कर्मचारी असे एकूण 1240 कर्मचारी मतदान पथकामध्ये असणार आहे. या चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 5013 पुरुष आणि 123 महिला असे एकूण 5136 अधिकारी-कर्मचारी मतदान पथकात राहणार असून 513 पुरुष आणि 39 महिला असे एकूण 552 अधिकारी-कर्मचारी मतदान पथकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. कार्यरत मतदान पथकात आणि राखीव पथकात 5526 पुरुष आणि 162 महिला असे एकूण 5688 अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रीयेतील मतदान पथकामध्ये असणार आहे.

जिल्हयातील चार विधानसभा मतदारक्षेत्रात 803 इमारतीत 1282 मतदान केंद्र

अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघात 316 मतदान केंद्र असून यापैकी 305 ग्रामीण भागात आणि 11 शहरी भागात आहेत. तिरोडा विधानसभा क्षेत्रात 263 ग्रामीण भागात आणि 32 शहरी भागात असे एकूण 295 आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात 361 मतदान केंद्र असून यापैकी 231 ग्रामीण भागात आणि 130 शहरी भागात आहेत. आमगांव विधानसभा क्षेत्रात 264 ग्रामीण भागात आणि 46 शहरी भागात असे एकूण 310 मतदान केंद्र आहेत. जिल्हयातील चारही विधासभा मतदारसंघात 1282 मतदान केंद्र असून त्यापैकी 1063 ग्रामीण भागात  व 219 शहरी भागात आहेत.

अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रे हे 251 इमारतीत आणि शहरी भागातील मतदान केंद्रे हे 6 इमारतीत आहेत. तिरोडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील  मतदान केंद्रे 167 इमारतीत आणि शहरी भागातील  मतदान केंद्रे 14 इमारतीत आहेत. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील  मतदान केंद्रे 113 इमारतीत व शहरी भागातील मतदान केंद्रे 34 इमारतीत आहेत. आमगांव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रे 203 इमारतीत व शहरी भागातील मतदान केंद्रे 15 इमारतीत आहेत. चारही विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदान केंद्रे 734 इमारतीत आणि शहरी भागातील मतदान केंद्रे 69 इमारतीत आहेत. जिल्हयातील चारही मतदारसंघातील 1282 मतदान केंद्र हे 803 इमारतीत आहेत.