तुमसर,दि.17 :- भाजपा हा कार्यशील व लोकहितासाठी काम करणारा पक्ष आहे, या पक्षात लोकविरोधी व पक्षविरोधी कार्यकर्त्यांना जागा नाही, लोकविरोधी धोरण असल्यास पक्ष बाहेरचा रस्ता दाखवेल असे ना. डॉ.परिणय फुके यांनी सांगितले.तुमसर विधानसभेचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडणूक प्रचार यात्रेस डॉ. फुकेंचे आतिशबाजी व ढोल-ताशांच्या जल्लोषात तुमसर नगरीत स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. फुकेंनी प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा मागितला.यावेळी खासदार सुनीलभाऊ मेंढ़े, माजी खासदार शिशुपाल पटले, निशिकांत इल्मे, कल्याणीताई भुरे, मुन्नाभाऊ फुंडे, सुनीलजी पारधी, डॉ. उल्हास बुराडे, उपशाजी बांते, रोशनताई नारनवरे, पंकज जी. बालपांडे, किशोरभाऊ चौधरी इत्यादिंसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तुमसरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. फुके म्हणाले, इतके वर्ष घोटाळे, भ्रष्टाचार, सरकारी योजनांमधून लूट करून विद्यमान आमदार आणि निवडणुकीत भाजपमधून काढून टाकलेले अपक्ष उमेदवार माझ्यामुळे तिकीट कापले असा अपप्रचार करतात. मात्र त्या व्यक्तीला महिलेचा सन्मान करता येत नाही, जो व्यक्ती महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी अपशब्द काढून विनयभंग करतो अशा व्यक्तीला तिकिट न देऊन पक्षाने योग्य तोच निर्णय घेतला असे मी मानतो. अशा बंडखोरांना जाण्याचा मार्ग दाखविला हे उत्तम केले. मी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी उचललेल्या आवाजबद्दल व तिच्या शौर्याला सलाम करतो. भाजपाचे सरकार असूनही तिने निर्भयपणे आपले कर्तव्य बजावले आणि त्या गैरवर्तन करणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात आवाज उठवून त्याला तुरूंगात जाण्याचा मार्ग दाखविला त्याबद्दल तिचे कौतुक वाटते.काही महिन्यांनंतर तुमसर मोहाडी परिसरात 1 हजार कोटी रुपये किंमतीची मोठी स्टील कंपनी येथे आणली जाईल, सिंचनासाठी, आरोग्यसेवांसाठी तसेच १२ तास पाणीपुरवठा करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. शेतकरी सन्मान योजनेचा मानधन न मिळालेल्या शेतक-यांच्या खात्यात 31 ऑक्टोबरपर्यंत मानधन देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हे सर्व 7 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे वचन डॉ. फुकेंनी येथे दिले.




