30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मागासवर्गियांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले-राजकुमा बडोले

मागासवर्गियांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले-राजकुमा बडोले

0
31

सडक अर्जुनी,दि.17ः-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी,शिवसेना रिपाई(आठवले)महायुतीचे उमेदवार माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी आज तालुक्यातील विविध गावांना भेटी देत मतदारांचे आर्शिवाद घेतले.यावेळी  बडोले म्हणाले की,दीक्षाभूमीच्या विकासकामासाठी शंभर कोटीची निधी देऊन विकास साधण्याचा प्रयत्न केला. सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय,मातंग समाजासाठी विभागीय स्तरावर स्वतंत्र वस्तीगृह उपलब्ध, वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य करिता स्वाधार योजना सुरू केली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शासनाच्या वस्तीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ४५ ते ६० हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातुन कामगारांना सेफ्टी कीट्स व विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी गोंदिया जिल्हाचा समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे त्यांनी मतदारांना पठवून सांगितले.यावेळी  त्यांच्यासोबत लक्ष्मीकांत धानगाये,गिरधारी हत्तीमारे,माधुरी पाथोडे,कविता रंगारी,शिला भेंडारकर,अशोक लंजे,शेषराव गि-हिपुंजे,परमानंद बडोले यांच्यासह तालुका पदाधिकारी,बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.