– भ्रमणध्वनीवरुन दिला मतदारांना संदेश
गोंदिया,दि.19ःविधान परिषदेत आ.गोपालदास अग्रवाल यांच्यासोबत सहकारी म्हणून १० वर्ष कार्य केले आहे. एक विकासाचे व्हिजन असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पक्षाचे व्हिजन केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच असल्याने आ. अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रचारासाठी येण्याची तीव्र इच्छा होती. परंतु खराब वातावरणामुळे २ तास आपण नागपूर विमानतळावर अडकून राहिल्याने गाोंदियात येऊ शकलो नाही. त्यामुळे मतदारांनी २१ तारखेला आ. अग्रवाल यांना निवडून दिल्यास आजची राहिलेली कसर पूर्ण करणार, असा संदेश केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांनी दिला.
गोंदिया येथे १८ ऑक्टोबर रोजी भाजपाचे उमेदवार आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ ना. नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, वातावरण खराब असल्याने हेलीकॉप्टर नागपूर विमानतळावरुन उडू शकले नाही. यामुळे भ्रमणध्वनीवरुन सभेतील मतदारांसोबत संवाद साधला. यावेळी प्रामुख्याने मध्यप्रदेशचे माजी कृषीमंत्री आ.गौरीशंकर बिसेन, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ.रामकिशोर कावरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, जिप अध्यक्षा सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. खोमेश रहांगडाले, जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा भावना कदम, जिपचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, पंकज यादव, रिपाई जिल्हाध्यक्ष राजेश रामटेके, दिनेश दादरीवाल, संजय कुळकर्णी, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, पंस सभापती माधुरी हरिणखेडे, सभापती रमेश अंंबुले, राजकुमार नोतानी, गणेश हेमणे, संतोष चव्हाण, डॉ. प्रशांत कटरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना ना.गडकरी म्हणाले की, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी विकासाची कास धरली आहे, ती कायम राहण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आपल्या व्यक्तव्यात आ. अग्रवाल यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीयत्व व विकास या मुद्यांनी आपल्यावर प्रभाव टाकल्यामुळे भाजपात येण्याची इच्छा झाली असल्याचे सांगितले. ना. गडकरी यांनी आपल्याला ४ महिन्यापूर्वीच भाजपात येण्याचे सुचविले होते. परंतु, थोड्या उशीराने आपला पक्षात प्रवेश झाल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. गत २७ वर्षात गोंदिया विधानसभा क्षेत्रात सातत्याने विकासाचे काम सुरु असून भविष्यातील ‘रोड मॅपङ्क तयार आहे. आज विरोधकांना कोणतेही मुद्ये नाही. तर उमेदवार भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी शेकत आहेत. त्यामुळे मतदारांनी पक्षाच्या नावावर दिशाभूल करणाèयांना त्यांची जागा दाखवावी व भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालन जयंत शुक्ला यांनी केले. तर आभार दीपक कदम यांनी मानले.




