27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी बडोलेना निवडून द्या-खासदार सुनील मेंढे

समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी बडोलेना निवडून द्या-खासदार सुनील मेंढे

0
57

अर्जुनी-मोर,दि.19ः- अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्र लाभलेले भाजपा उमेदवार इंजिनीयर राजकुमार बडोले हे विकास पुरुष आहेत वंचित घटकांसाठी त्यांनी केलेली विकास कामे यांना तोड नाही. जनतेच्या आशीर्वादाने राजकुमार बडोले यांना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे राज्यात सामाजिक न्याय विभाग काय असते हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. सामाजिक समता प्रस्थापित करून वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे राजकुमार बडोले यांना या विधानसभा क्षेत्राचा चेहरामोहरा यासाठी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा खासदार सुनील मेंढे यांनी केले. ते अर्जुनी-मोर तालुक्यातील इंजोरी येथे 17 ऑक्टोबरला आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला सभेला भाजपा शिवसेना आरपीआय आठवले गट महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य कमलताई पाऊलझगडे, राजेश कटनी, जिल्हा महामंत्री लायक राम भेंडारकर, सडक अर्जुनी चे उपसभापती राजेश कठाणे, मधुकर दुनेदार, मुरलीधर ठाकरे, गिरीश बागडे, बार्शी महाराज यमुताई ब्राह्मणकर, गीता ब्राह्मणकर व इतर मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना खासदार सुनील मुंडे म्हणाले की राजकुमार बडोले यांनी मंत्रीपदाच्या काळात ऐतिहासिक कार्य केले राज्यात सामाजिक विभागाच्या माध्यमातून चौसष्ट महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे. निराधारांना सहाशे रुपये वरून एक हजार रुपये मासिक मानधन सुरू केले कलाकारांची निवड मर्यादा वाढवून मानधनात वाढ केली राज्यातील दिव्यांग यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष तरतूद केली गोंदियाचे पालकमंत्री म्हणून यांनी गोंदिया जिल्ह्याची ओळख निर्माण करून दिली. राज्यातील अनेक सामाजिक धार्मिक व इतिहासिक स्थळांचा विकास यासोबतच आपल्या विधानसभा क्षेत्राचा विकास केला आहे. भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी सर्वाधिक विकास कामे केल्याने पक्षाने बडोले साहेबांना उमेदवारी दिली त्यांना संधी देणे आता आपल्या हातात आहे आपण त्यांना निवडून द्या पण पुन्हा मंत्री पद मिळण्यासाठी प्रचंड मतांच्या टक्केवारीत निवडून द्या असे आवाहन खासदार खासदार सुनील मेंढे यांनी मतदारांना केले. यावेळी उमेदवार यांनीही मार्गदर्शन करताना जनतेचा आशीर्वाद आपल्याला विजयाचा मार्ग दाखवेल अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातील जनतेचे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. दोनदा मला आमदार केलं त्यामुळे राज्याचा मंत्री झालो जनतेच्या सहकार्याने हे सर्व घडून आले मी माझ्या जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही व जाऊ देणार नाही. मलापण तिस-यांदा संधी देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती राजकुमार यांनी केली सभेचे संचालन गिरीश बागडे यांनी केले या प्रचार सभेला हजारो मतदान उपस्थित होते.