अर्जुनीमोर.दि.19ः-भारतीय जनता पार्टी,शिवसेना,आर पी आय (आ) व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ सडक अर्जुनी,कोहमारा,सौंदड,पळसगाव,राका, चिखली, नवेगाव बांध,उमरी,बाक्टी,चान्ना,बोडगाव/देवी,खांबी,निमगाव,अर्जुनी मोर येथे भव्य बाइक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी फिर एक बार राजकुमार,कहो दिल से राजकुमार बडोले फिर,अब की बार हॅट्रीक पार अशा घोषणा देत विधानसभा क्षेत्रातील युवा भाजप,शिवसेना,रिपाई कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
रैली दरम्यान भारतीय जनता पार्टी,शिवसेना,आर पी आय (आ) व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोलेनी येत्या काळात विकास साधण्यासाठी अधिकाधिक मतांनी निवडणूक येण्यासाठी नागरिकांकडून आशीर्वाद व पाठिंबा मागितला.यावेळी रचना गहाणे,लायकराम भेंडारकर, उमाकांत ढेंगे,,विजय बिसेन,लक्ष्मीकांत धानगाये,शेषराव गि-हिपुंजे,अशोक लंजे,केवळराम पुस्तोडे,रघुनाथ लांजेवार,राजेश कठाणे,विजय अरोरा,अश्विनसिंह गौतम,परमानंद बडोले,शंकर खेकरे,संदिप कापगते,भोजु लोगडे,युनुस पटेल,मंजुषा तरोणे,गिता ब्राम्हकर,अंजली मुनेश्वर,कविता रंगारी,मिना शहारे,भारती मेश्राम,जिजा पाथोडे याांच्यासह तालुका पदाधिकारी,बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख,,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




