गोंदिया दि. 20 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यादरम्यान निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 19 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील महागाव येथून एक चारचाकी व एक दुचाकी वाहनातून 540 देशी दारुच्या बाटल्यासह एकुण 5 लाख 61 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





