30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ मतदान केंद्रांवरनियुक्तीसाठी मनुष्यबळाचे तिसरे सरमिसळीकरण पूर्ण

मतदान केंद्रांवरनियुक्तीसाठी मनुष्यबळाचे तिसरे सरमिसळीकरण पूर्ण

0
29
  • पथकांची मतदान केंद्रनिहाय नियुक्त

वाशिम, दि. 20 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करावयाच्या मनुष्यबळाचे तिसरे सरमिसळीकरण आज संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू, कायदा व सुव्यवस्था (पोलीस) निवडणूक निरीक्षक मोहम्मद रहेमान, निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांची उपस्थिती होती.

मतदान अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जिल्ह्यातून एकूण ८ हजार १३१ अधिकारीकर्मचाऱ्यांची माहिती एनआयसीच्या प्रणालीवर अपलोड करण्यात आली. यामधून संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने प्रथम सरमिसळीकरणाद्वारे ६ हजार ६९२ अधिकारीकर्मचाऱ्यांची मतदान केंद्राध्यक्षप्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर  संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने दुसऱ्या सरमिसळीकरणाद्वारे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रस्तरीय पथके तयार करण्यात आली. त्यानंतर आज संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने झालेल्या तिसऱ्या सरमिसळीकरणानंतर या पथकांची मतदान केंद्रनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, मनुष्यबळ व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा अधीक्षक प्रशांत जाधव, श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी प्रशांत बोरसे, श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार, श्री. रहेमान यांचे संपर्क अधिकारी श्री. वाठोरे यांची उपस्थिती होती.