36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्हयात अंदाजे  70 टक्के मतदान

जिल्हयात अंदाजे  70 टक्के मतदान

0
25

  • सर्वत्र शांततेत मतदान
  • महिला मतदारांचा उत्साह

भंडारा,दि. 22 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी तुमसर, भंडारा व साकोली या तीन विधानसभा क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले. कुठेही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही. आज 5 वाजेपर्यंत झालेल्या जिल्हयात सरासरी 64.01 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये तुमसर 66.20 टक्के, भंडारा 59.53 टक्के व साकोली 67.13 टक्के मतदान झाले असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 70 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत एकूण 6 लाख 34 हजार 877 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये 3 लाख 18 हजार 772 पुरुष मतदार तर 3 लाख 16 हजार 105 महिला मतदारांनी मतदान केले आहे.

सकाळी 7 वाजता मतदानाला शांततेत प्रारंभ झाला. सुरुवातीला मतदानाचा उत्साह कमी असला तरी 11 नंतर मतदानाला वेग आला. तुमसर विधानसभा क्षेत्रात 356 मतदान केंद्रावर एकूण  3 लाख 2 हजार 923 मतदारांपैकी 2 लाख 544 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 1 लाख 584 पुरुष तर 99 हजार 960 महिला मतदार आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात  456 मतदान केंद्रावर एकूण 3 लाख 70 हजार 574 मतदार आहेत. यापैकी 2 लाख 20 हजार 587 मतदारांनी मतदान केले असून यात 1 लाख 12 हजार 820 पुरुष तर 1 लाख 7 हजार 767 महिला मतदार आहेत.

साकोली विधानसभा क्षेत्रात 394 मतदान केंद्रावर 3 लाख 18 हजार 393 मतदार आहेत. यापैकी 2 लाख 13 हजार 746  मतदारांनी मतदान केले असून यात 1 लाख 5 हजार 368 पुरुष तर 1 लाख 8 हजार 378 महिला मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणूकीमध्ये महिला मतदारांचा उत्साह वाखणण्याजोगा होता आणि पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी सहभाग घेतला. सखी व आदर्श मतदान केंद्रात महिलांनी सक्रीय सहभाग घेऊन मतदान केले. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. या निवडणूकीत दिव्यांगासोबतच ज्येष्ठ मतदार तसेच नवमतदारांनी हिरहिरीने मतदानात सहभाग नोंदविला. यावेळी ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनातर्फे व्हिलचेअर, रॅम्प, वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना मतदान करणे सोयीचे व सुलभ झाले. निवडणूकीत ईपिक कार्डासोबतच 11 ओळखपत्राच्या आधारे मतदारांनी मतदान केले.125 मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेवर थेट लक्ष क्रेंद्रित केले होते.

blank